
एलियन्सच्या अस्त्वित्वाचा शोध ‘नासा’ या संस्थेतर्फे अनेक वर्षांपासून घेतला जात आहे. याबाबत नासातर्फे अनेक योजनाही आखण्यात येत असतात. आता या मोहिमेत अजून एका नव्या मोहिमेची भर पडली आहे.
एलिसयन्सचा शोध घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद कसा साधावा? एलियन्सशी कसे बोलावे? यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण नासाकडून देण्यात येणार आहे. याकरिता नासा एलियन्सशी संवाद साधू शकतील, अशा धर्मगुरुंची निवड करणार आहे. परग्रहावरील जगताचा शोध घेण्याकरिता आणि तेथील जीवांच्या उत्त्पत्तीबाबत माहिती घेण्याकरिता ही मोहिम परिणामकारकरीत्या पार पाडू शकतील अशा व्यक्तिंची निवड नासाकडून करण्यात येत आहे.
एलियन्सबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा मेक्सिकोमधील एका जमातीने केला आहे. या जमातीचे म्हणणे आहे की, एलियन्स परग्रहावर सापडण्याची शक्यता जास्त आहे. अमेरिकन लष्करी तळाजवळ अनेक दशकांपासून राहणाऱ्या एका मेक्सिकन आदिवासींच्या जमातीने एलियन्सबाबत एक अविस्मरणीय अनुभव सांगितला. त्यांचे असे म्हणणे आहे की, या तळाजवळ एलियनचे येणे-जाणे असते. एलियन येथील स्थानिकांच्या गायी पळवून नेतात. त्यांचे हातपाय कापतात. हे लोक जवळपास 60 वर्षांपासून येथे राहत असून ही जमात त्यांच्यामुळे त्रस्त झाली आहे तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, पर्वताभोवती अनेकदा एलियन्स त्यांना दिसले आहेत. न्यू मेक्सिकोमधील शहराजवळ जिथे एलियन्स दिसतात त्या जागेला ‘डल्स बेस’ म्हणून ओळखले जाते.
24 धर्मगुरुंची मदत
एलियन्सशी संवाद साधण्याकरिता नासाने एक योजना तयार केली आहे. याकरिता 24 धर्मगुरुंची मदत घेतली जाणार आहे. या मोहिमेद्वारे नासातर्फे एलियन्सशी संवाद साधण्याकरिता निवड झालेल्या धर्मगुरुंना अंतराळात पाठवणार आहेत. याबाबत ब्रिटिश धर्मगुरु डॉ. अँड्र्यु डेव्हिडसन सांगतात की, जगातील विविध धर्म परग्रहावरील एलियन्सच्या जीवनाबाबत काय प्रतिक्रिया देतील, याबद्दल नासाला माहिती हवी आहे तसेच याकरिता पृथ्वीच्या कक्षेबाहेरील त्यांचे जीवन शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रगतीचाच एक भाग असून यामुळे परग्रहावरील जीवांचा शोध, देव आणि जीवांच्या उत्त्पत्तीबाबत मोठा शोध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





























































