नासाने बनवला व्हेंटीलेटर प्रोटोटाइप

1066

सध्या संपूर्ण विश्वाला एकच चिंता भेडसावत आहे आणि ती म्हणजे कोरोना व्हायरस या रोगाशी मुकाबला करण्यासाठी विविध देश अनेक उपाययोजना राबवत आहेत. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, रोग्यांवरच्या इलाजासाठी आणि या रोगावर रामबाण औषध शोधण्यासाठी अनेक दिग्गज कंपन्या आणि संस्थादेखील कार्यरत आहेत. अवकाश विश्वात जगप्रसिद्ध असलेली नासा संस्थादेखील यात मागे नसून अवघ्या 37 दिवसांत नासाने एक व्हेंटीलेटरचे डिझाइन तयार करून, त्याचा प्रोटोटाइप बनवण्यात यश मिळवले आहे. नासाच्या ‘जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी ‘ या कॅलिफोर्नियास्थित विभागाने covid-19 अर्थात कोरोनाबाधित रुग्णांच्या गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना कृत्रिमरीत्या श्वास घेता यावा यासाठी या व्हेंटीलेटरची निर्मिती केली आहे. नासा सध्या यूएस फूड ऍन्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनकडून आणीबाणीच्या परिस्थितीत या उपकरणाच्या वापरासाठीच्या परवानगीसाठी अधिकृत पाठपुरावा करीत आहे. जेपीएलचे संचालक मायकेल वॉटकिन्स यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अंतराळयानात तज्ञ आहोत, वैद्यकीय उपकरणे बनवण्यात नाही. परंतु उत्कृष्ट अभियांत्रिकी, कठोर चाचण्या आणि प्रोटोटाइपचा नमुना जलदगतीने बनवणे ही आमची वैशिष्टय़े आहेत.’.’जेपीएल’ लॅबमधील लोकांना जेव्हा समजले की आता वैद्यकीय क्षेत्राला आणि एकूणच समाजाला मदत करण्याची आता नितांत आवश्यकता आहे, तेव्हा त्यांच्याकडे जे काही आहे, ते चातुर्य, कौशल्य आणि बांधिलकी त्यांनी या कार्यासाठी वापरणे आपले कर्तव्य मानले. नासाच्या दाव्यानुसार पारंपरिक व्हेंटीलेटर मात देण्याचा किंवा त्यांना बदलण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, मात्र हे नवे उपकरण अधिक वेगवानरित्या कार्यरत होते आणि ते अधिक सहजपणे वापरता येते. याची बांधणी तुलनेने लवचिक आहे. मुख्य म्हणजे आरोग्यसेवा कर्मचारी, विट-अ-मोर्टार रुग्णालये आता अपुरी पडू लागल्याने संपूर्ण अमेरिकेच्या विविध औषधोपचार केंद्रांमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये तसेच ज्या हॉटेलचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले आहे तेथे ही नवी उपकरणे सहजपणे बसवून वापरता येणे शक्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या