Nashik Bus Accident – एक धडक आणि संपूर्ण बस पेटली, पाहा ही थरकाप उडवणारी दृश्य

नाशिकमधील नांदूर नाक्याजवळ एका खासगी बसला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतला असून त्या आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 21 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये एका बाळाचा व त्याच्या आईचा देखील समावेश आहे.

या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

ही बस यवतमाळवरून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान नाशिकमधील नांदूर नाक्याजवळ या बसची एका ट्रेलरसोबत धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की बसने धडकेनंतर तत्काळ पेट घेतला. त्यामुळे बसमधील प्रवाशांना बाहेर देखील पडता आले नाही.