यंदाचा गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा स्थगित, वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा निर्णय

kusumagraj-pratishthan

वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आयोजित केलेला ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार समारंभ स्थगित केला आहे. ही माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी ईमेलद्वारे दिली आहे.

या पुरस्कार समारंभाचे आयोजन शनिवार दि. 27 फेब्रुवारी रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले होते. एक वर्षाआड दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ म्हणजे आपल्या विशिष्ठ क्षेत्रात असामान्य कामगिरी करून भारतीय समाजाचे सांस्कृतिक, सामाजिक जीवन समृद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींना प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञतेचा नमस्कार असतो.

मागील वर्षीही हा पुरस्कार कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे शासनाच्या निर्णयानुसार स्थगित करण्यात आला होता. तो या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी होणार होता. प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत मा. अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या