नाशिक: मोदींच्या सभेत दिसला कांदा शेतकऱ्यांचा रोष; जोरदार घोषणाबाजी करत केली कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी

Lok Sabha Election 2024 च्या निमित्तानं प्रचार सभांचा धुरळा उडाला आहे. पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या आधी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली. कांदा आणि द्राक्ष शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेत सभास्थळी प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र तरी देखील सुरक्षा भेदत एका शेतकऱ्यानं जोरदार घोषणाबाजी केली. कांदाप्रश्नावर चर्चा करण्याची मागणी यावेळी करण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं.

मोदींच्या भाषणा दरम्यान कांदा शेतकऱ्यानं जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कांदा उत्पादकांनी पंतप्रधान मोदी यांना कांदा प्रश्नी बोलण्याची केली मागणी. यामुळे सभास्थळी चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेर काढलं.