
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेत मिंधे सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सिनेटच्या निवडणुका रद्द केल्यावरून भाजपला फटकारले आहे.
एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता आता जो सत्ताधारी पक्ष आहे, ज्यांनी सत्ता हुकूमशाहीने मिळवलेली आहे. ते केवळ राजकारण करत आहेत. जनतेच्या प्रश्नावर कुठेही बोलले जात नाही. आता जर पाहिले तुम्ही तर या सरकारमध्ये एक महाशक्त असं स्वताला समजतात आणि एक पक्ष फोडून स्वताकडे घेतलेल गट, एक कुटुंब फोडून घेतलेला गट. हे सगळं असून देखील साध्या सिनेटच्य़ा निवडणुका घेण्याची यांची हिंमत नाही आहे. असे हे आपले सरकार आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मी हुडी घालून छुप्या भेटी गाठी करत नाही
मी छुप्या भेटी गाठी आणि हुडी घालून कुणाला भेटायला जाणं असं काही मी करत नाही. मुख्य गोष्ट अशी होती की, नाशिकमध्ये जे दोन रिसॉर्ट आहेत एक ग्रीक काऊंटी आणि विवेदा खरोखर चांगले रिसॉर्ट आहेत. इथल्याच एका तरुण व्यक्तीने बनवले आहे. मला ते पाहायचे होते. कारण पर्यटन मंत्री होतो तेव्हापासून मला ते पाहायचते होते. आज मला संधी मिळाली. त्या रिसॉर्टमध्ये पर्यावरण आणि पर्यटन हे एकत्र केले आहे आणि म्हणून मी ते बघायला गेलो होतो. मला छुप्या भेटींची गरज नाही जे काही असतं ते जगजाहीर असतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
कुणासाठी दारं खुली ठेवायची ते उद्धव ठाकरे ठरवतील
आता कोणासाठी दरवाजे उघडे आणि कोणासाठी दरवाजे बंद हे आता उद्धव ठाकरे ठरवतील. पण एकंदरीत वागणूक पाहिली आपण त्या गद्दार गॅंगमधील लोकांची. तर कोण कधी कोणत्या पत्रकाराला रस्त्यावर धोपटतायत, कधी एका आमदाराचा मुलगा बंदूक रोखून एका उद्योजकला स्वत:च्या ऑफिसमध्ये आणतायतं , माहिममध्ये गणपतीची मिरवणूक येते त्यावेळी बंदूक रोखून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चालवली होती. हे सगळं जे दादागिरीचे वातावरण झाले आहे. हे स्वच्छ करण्यासाठी आता आम्ही राजकारण करणार आणि हे साफ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
जे कोणी सत्य बोलतय त्यांना सतावले जातेय
इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत बोलाताना आदित्य ठाकरे म्हणाले, आता 31 आणि 1 तारखेला देशभरातील निवडणुकांच्या चर्चा होणार आहेत. मुंबई एक केंद्रस्थान आहे, सत्तास्थान आहे. वातावरण बदलत चालले आहे. जेवढी इंडियावर टीका होत आहे याचा अर्थ तेवढी भिती विरोधकांनी घेतली आहे. सर्व पक्ष आम्ही एकत्र आल्याचं दिसतंय ते जगजाहीर आहे. आता आम्ही महाराष्ट्रासाठी, देशासाठी जे लढत आहोत. ते पक्ष वगैरे विसरुन आम्ही देशासाठी एकत्र आलो आहोत. आज जर तुम्ही पाहिले तर या देशामध्ये लोकशाही आहे की नाही हा एक खूप महत्वाचा विषय झालेला आहे. विरोधकांवर धाडी पडतायतं, केंद्रिय यंत्रणा पाठी लावलेल्या आहेत. उद्या पत्रकार म्हणून तुमच्यावरही होणार आहेत. परवा सामान्य नागरिकांवरही धाडी टाकल्या जातील. जे कोणी सत्य बोलतय त्यांना सतावले जातेय. मी सतत बोलत आलोय की सत्यमेव जयते. भ्रष्टाचाऱ्यांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून स्वच्छ केलं जातंय, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.