
विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याप्रकरणी नाशिकमध्ये एका खागजी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.प्रथम वर्षाच्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार रविवारी रात्री दोनच्या सुमारास तीन वरिष्ठ विद्यार्थी या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या खोलीत घुसले. नंतर त्याला कपडे काढण्यास सांगितले. विद्यार्थ्याने याचा विरोध केला तेव्हा वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्याच्यावर जबरदस्ती केली. तेव्हा पीडित विद्यार्थ्याने तेथून पळ काढला आणि हॉस्टेलबाहेर सुरक्षा रक्षकाला सांगितले. नंतर विद्यार्थ्याने आपल्या पालकांशी संपर्क साधला. पालकांनी कॉलेज प्रशासनाला सांगून तक्रार केली. तेव्हा कॉलेजचे प्राचार्य आणि अधिकार्यांनी हॉस्टेलकडे धाव घेत चौकशी केली. तेव्हा तीन वरिष्ठ विद्यार्थी दोषी आढळले. त्यांना तत्काळ निलंबीत करून हॉस्टेल सोडण्याचे आदेश देण्यात आले.





























































