‘कोरोना’मुळे सतर्कता; त्र्यंबकेश्वर मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीचा

565

जगभरात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असल्याने खबरदारी म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिरातील कर्मचाNयांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्कचे वाटप करून आजपासून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती विश्वस्त, पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी दिली. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिरात देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. सध्या आपल्या देशातही कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने त्याचा फैलाव होवू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी देवस्थान कार्यालयात गुरुवारी विश्वस्त डॉ. सत्यप्रिय शुक्ल, दिलीप तुंगार व प्रशांत गायधनी यांनी चर्चा केली. त्यानंतर मंदिरात कार्यरत असलेल्या 138 कर्मचाऱ्यांना लगेचच मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला, त्यांना मास्कचे वाटपही पार पडले आहे. मंदिर व प्रांगणाची स्वच्छता दररोज चारवेळा केली जात होती, आता दिवसातून आठवेळा स्वच्छतेचा

निर्णय घेतला आहे. भाविकांनी दर्शनाआधी हात-पाय स्वच्छ धुवावेत, दर्शन रांगेत अस्वच्छता करू नये, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना पुढील किमान आठ दिवस मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

श्रीरामकुंडावर स्वच्छता मोहीम

नाशिक येथे देवदर्शनासाठी देश-विदेशातून भाविक येत असतात. त्या पाश्र्वभूमीवर श्रीरामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वत: या ठिकाणी जावून पाहणी करून सूचना दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या