नाशिक – जेलरोड येथून एटीएम पळवण्याचा प्रयत्न

जेलरोड येथे शुक्रवारी पहाटे युनियन बँकेचे एटीएम पळविण्याचा तीन चोरट्यांचा प्रयत्न फसला. पोलीस वाहनाच्या सायरनचा आवाज ऐवूज येताच त्यांनी तेथून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. सेंट फिलोमिना शाळेसमोरील ड्रिम मिनी मार्केटमध्ये युनियन बँकेची शाखा असून, त्याच्या शेजारच्या गाळ्यातच बँकेचे एटीएम, सीडीएम व पासबुक प्रिंटींग मशीन आहे. तीन चोरटे शुक्रवारी पहाटे पावणेचार वाजता या एटीएमच्या गाळ्याचे शटर उघडून आत घुसले. फाऊंडेशन तोडून एटीएम मशीन बाहेर सरकवत असतानाच रस्त्यावरून पोलीस वाहनाच्या सायरनचा आवाज ऐकताच ते पसार झाले. ही घटना सकाळीउघडकीस आली. शाखा व्यवस्थापक यशवंत बाळासाहेब वाघ यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएम सेंटरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पावणेचार वाजता तीनजण आत घुसल्याचे, त्यानंतर 5 वाजून 10 मिनिटांनी सायनरच्या आवाजामुळे ते बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. नाशिकरोड पोलिसांचे एक पथक तपासासाठी रवाना झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या