आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची झंझावाती सभा

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ बुधवारी, 15 मे रोजी नाशिक येथे धडाडणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्या सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. या सभेला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या झंझावाती विराट सभेची पदाधिकारी, शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे.