नाशिक जिल्ह्यात अकस्मात मृत्यूचे सत्र थांबेना, आणखी तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक शहरात दोन, तर ओझर येथे एका व्यक्तीचा काल प्रकृती अस्वस्थतेमुळे मृत्यू झाला. शहरात चार दिवसांपासून अकस्मात मृत्यू वाढले आहेत. नाशिकरोडच्या रेल्वे स्थानकासमोरील मंदिरात पूजा करणारे गवळीबाबा (60) हे शुक्रवारी दुपारी मंदिरात बेशुद्ध झाले. हे समजताच नाशिकरोड पोलीस घटनास्थळी आले तेव्हा ते मृतावस्थेत आढळले.

शरणपूर रोडवरील कस्तुरबा झोपडपट्टीत राहणाऱया शकुंतला अनिल शर्मा (65) यांचा शनिवारी सकाळी काहीतरी आजाराने मृत्यू झाला. निफाड तालुक्यातील ओझर येथील शंकर मोतीलाल बागुल (77) यांची अचानक तब्येत बिघडल्याने शनिवारी संध्याकाळी उपचारासाठी एचएएल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासून मृत घोषित केल्याची माहिती ओझर पोलिसांनी दिली.