सलग सहा दिवस शुभारंभाचे प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लेखक, दिग्दर्शक व निर्माता आनंद म्हसवेकर यांच्या ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग सलग सहा दिवस चालणार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे पुन्हा एकदा रंगभूमीवर येत असून ते या नाटकाचे यूएसपी ठरणार आहेत. या नाटकाचा पहिला प्रयोग आज 16 ऑगस्ट रोजी शिवाजी मंदिरात रात्री 8 वाजता रंगणार असून त्यानंतर सावित्रीबाई फुले नाटय़गृह (17 ऑगस्ट), गडकरी रंगायतन (18 ऑगस्ट), कालिदास नाटयगृह (19 ऑगस्ट), प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह (20 ऑगस्ट) आणि 21 ऑगस्ट रोजी पुन्हा शिवाजी मंदिर असे हे सहा दिवस सलग प्रयोग असतील. ‘प्रयोग फॅक्टरी’ निर्मित व ‘जिव्हाळा’ प्रकाशित या नाटकाचे दिग्दर्शन शिरीष राणे यांनी केलंय, तर संदेश बेंद्रे यांनी या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे.