लायन अ‍ॅशेसमधून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग दहा वर्षे आणि 100 कसोटी खेळण्याचा पराक्रम रचणाऱ्या नॅथन लायनला क्षेत्ररक्षण करताना पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित तिन्ही अॅशेस सामन्यांना मुकावे लागणार आहे. लायनची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला आता काही महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने लायन उर्वरित तिन्ही सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे आज जाहीर केले.

आता त्याच्या जागी टॉड मर्फी या युवा गोलंदाजाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप त्याची घोषणा करण्यात आलेली नाही. मर्फी हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेत चांगली गोलंदाजी केली होती. लायन आता आपल्या पुढील उपचारांसाठी लंडनलाच थांबणार की मायदेशी परतणार, याबाबतही अनिश्चितता आहे.