National Education Day- हे आहेत शिक्षण क्षेत्रातले ‘क्रांतिकारक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे पहिले शिक्षण मंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची आज जयंती. म्हणूनच 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आझाद यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीची स्थापना केली होती. देशभरातील विद्यापीठांचा दर्जा राखणं, विद्यापीठात देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांचं नियमन करणं अशा अनेक महत्त्वाच्या भूमिका यूजीसी ही संस्था बजावते. हिंदुस्थानी शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या या निर्णयामुळेच त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जाणून घेऊया शिक्षण क्षेत्रातल्या काही क्रांतिकारकांना, ज्यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं आहे.

isaac-newton१. सर आयझॅक न्यूटन-
गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारे सर आयझॅक न्यूटन एक थोर गणितज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी काही काळ अध्यापनही केलं होतं. सूर्य आणि ग्रहांच्या गतीचा लॉ ऑफ मोशनचा सिद्धांत, हवेत गेलेली वस्तू पुन्हा खाली पृथ्वीवर पडते, हे सिद्ध करणारा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असे महत्त्वपूर्ण शोध न्यूटन यांनी लावले. तसंच, प्रकाशात असलेले सात रंग हाही न्यूटन यांचाच शोध. त्यांनी लावलेले अनेक शोध हे पुढील पिढ्यांच्या अभ्यासासाठी साहाय्यभूत ठरले.

pythagoras२. पायथागोरस
थोर ग्रीक गणितज्ञ पायथागोरस हे वैज्ञानिक आणि शिक्षकही होते. काटकोन त्रिकोणाच्या मापनासाठी उपयोगात येणारे पायथागोरसचे प्रमेय हा त्यांचा सर्वांना माहीत असलेला सिद्धांत. त्याखेरीज पायथागोरस यांनी ज्योतिषशास्त्र आणि गणिताचाही अभ्यास केला होता. गणितातील त्यांच्या या योगदानासाठी त्यांना फादर ऑफ नंबर्स या नावानेही ओळखलं जातं.

dr-sarvepalli-radhakrishnan३. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
हिंदुस्थानात ज्यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा केला जातो, ते हिंदुस्थानचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. अवघ्या 21व्या वर्षी अध्यापनाला सुरुवात करणाऱ्या डॉ. राधाकृष्णन यांनी अनेक विद्यापीठांमध्ये अध्यापनाचं कार्यं केलं. हिंदू संस्कृतीतील पुराणे यांचा प्रगाढ व्यासंग, अध्यापन क्षेत्रातली कुशलता यांमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय झाले.

albert-einstein४. अल्बर्ट आईनस्टाईन-
सापेक्षतावादाचा सिद्धांत आणि जगाला अणुउर्जेची ओळख करून देणारा मास एनर्जी इक्वेशनचा सिद्धांत मांडणारे आईनस्टाईन हे थोर भौतिक शास्त्रज्ञ आणि शिक्षक होते. जगात अणुउर्जेच्या मदतीने झालेली क्रांती हा आईनस्टाईन यांच्याच शोधाचा परिणाम आहे. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी योगदान दिलं होतं.

savitribai५. सावित्रीबाई फुले-
सावित्रीबाई फुले या हिंदुस्थानच्या पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. अक्षर ओळख नसतानाही पती ज्योतिराव फुले यांच्या आग्रहाखातर त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि स्त्री-शिक्षणाचा पाया रोवला. समाजाचा प्रखर विरोध सहन करूनही त्यांनी आपलं अध्यापनाचं कार्य सुरू ठेवलं. रुढी-परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या थोर समाजसुधारकांपैकी सावित्रीबाई फुले एक होत्या. विधवांवर होणाऱ्या अत्याचारातून जन्मलेल्या मुलांना सांभाळून त्यांचं संगोपन करण्यासाठी ज्योतिरावांनी स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाला सांभाळण्याचं कार्यही त्यांनी केलं.