पश्चिम बंगालमधील बर्धमान रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, अनेक प्रवासी जखमी; तिघांची प्रकृती चिंताजनक

पश्चिम बंगालमधील बर्धमान रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म 4 जवळ ही घटना घडली. रेल्वे सुरक्षा दल (RPF), रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे स्थानकात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, बर्धमान रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4, 6 आणि 7 एकाच वेळी गाड्या आल्या. ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 6 फूटओव्हर ब्रीजकडे धाव घेतली. यामुळे ब्रीडच्या पायऱ्यांजवळ गर्दी झाली. गर्दीत काही प्रवाशांनी एकमेकांना धक्का दिला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये किरकोळ हाणामारी झाली. यात पुलावरील काही प्रवासी पायऱ्यावरील प्रवाशांवर पडले. त्यामुळे काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. काहींच्या डोक्याला दुखापत झाली, तर काही प्रवाशांचे हात आणि पायही तुटले.