
वाढदिवस साजरा करण्यासाठी चिमुकली पालकांसोबत बीचवर गेली. मात्र हे सेलिब्रेशन तिचे शेवटचे ठरले. बीचवर मासे आणि चिकन फ्राईड खाल्ल्यानतर सहा वर्षाच्या चिमुकलीची तब्येत बिघडली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
तामिळनाडूतील चेन्नई शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. इरोड जिल्ह्यातील रहिवासी असलेले महेंद्रन यांना लिव्हरची समस्या असल्याने ते चेन्नईतील वडापलानी परिसरात उपचारासाठी राहत होते. त्यांची सहा वर्षांची मुलगी संजना ही इरोड येथेच नातेवाईकांकडे राहत होती. संजनाचा वाढदिवस असल्याने ती चेन्नईत माता-पित्यांकडे आली होती.
आई-वडिलांनी मुलीला वाढदिवस साजरा करण्यासाठी बीचवर नेले. तेथे त्यांनी मासे आणि चिकन फ्राईड राईस खाल्ला. दुसऱ्या दिवशी संजनाला ताप आला. पालकांनी तिला औषध दिलं मात्र काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे पालकांनी तिला रुग्णालयात नेत असतानाच तिच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी संजनाला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.