राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता वाढली…जाणून घ्या सोशल मिडीयावर सर्वाधिक पसंती कोणाला…

arvind-kejriwal-rahul-gandhi

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता उर्वरीत टप्प्यांसाठी नेत्यांचा प्रचार सुरू आहे. काळ बदलला तसे निवडणूक प्रचाराचे तंत्रही बदलले. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांच्या काळात निवडणूक प्रचारात मोलाचा बदल झाला. तसेच गेल्या 10 ते 15 वर्षांपासून निवडणूक प्रचारात सोशल मिडीया महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी सोशल मिडीया महत्त्वाचे साधन ठरले आहे.

सोशल मिडीयावर अनेकजण प्रतिक्रिया देत असल्याने जनभावना समजण्यास मदत होत आहे. तसेच यावरून कोणत्या पक्षाची आणि कोणत्या नेत्यांची लोकप्रियता वाढत आहे. कोणाची घटत आहे, याबाबतही अंदाज करता येऊ शकतो. सोशल मिडीयाच्या आकडेवारीवरून या क्षेत्रात भाजपचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यांचे लाइक्स कमी झाले आहे. तर इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर नवीन यूजर्स जोडण्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे.

6 ते 12 एप्रिल यादरम्यान राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या यूट्यूब चॅनेलला मिळालेल्या प्रतिक्रियांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुमारे 31 टक्के यूजर्स राहुल गांधी यांचे यूट्यूब चॅनेल पाहत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चॅनेलचे सबस्क्रायबर जास्त आहेत. मात्र, त्यांची दर्शकसंख्या फक्त 9 टक्केच आहे. तसेच यूट्यूब यूजर्सच्या बाबतीत काँग्रेस आणि आपने बाजी मारली आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसून येते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून येत आहे.

6 एप्रिल ते 12 एप्रिल या काळात राहुल गांधी यांचे युट्युब चॅनेल आणि 5 कोटी 80 लाख दर्शकांनी पाहिले. हे चॅनेल पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पार्टीचे युट्युब चॅनेल आहे. या चॅनलला 2 कोटी 80 लाख दर्शकांची पसंती लाभली आहे. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्षाचे चॅनल असून त्यांची दर्शकसंख्या 2 कोटी 60 लाख एवढी आहे. चौथ्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चॅनल आहे. त्याची दर्शकसंख्या 1 कोटी 50 लाख आहे. काँग्रेस पक्षाच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये जानेवारीमध्ये 59 हजार, फेब्रुवारीमध्ये 70 हजार आणि मार्चमध्ये 1.08 लाखांहून अधिक वाढ झाली आहे.

आम आदमी पक्षाने सातत्याने नवीन फाॅलोअर्स मिळवत यूट्यूबवर चांगले यश मिळवले आहे. तर भाजपच्या यूट्यूब चॅनेलच्या फाॅलोअर्समध्ये सातत्याने घट होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने तीन महिन्यांत त्यांच्या चॅनेलवर 5.9 लाख फाॅलोअर्स जोडले. मार्चमध्ये 3.6 लाखांहून अधिक फाॅलोअर्सची वाढ झाली. काँग्रेसच्या चॅनेलचे 5 लाख फाॅलोअर्स वाढले.

तीन महिन्यांत काँग्रेसने या वर्षी इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर 13.2 लाख फॉलोअर्स वाढले आहेत. भाजपच्या पेजला 8.5 लाख फॉलोअर्स आणि आम आदमी पार्टीच्या पेजला 2.3 लाख फॉलोअर्स मिळाले. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर्चस्व ठेवले आहे. जानेवारी ते मार्च या काळात राहुल गांधींचे फॉलोअर्स अंदाजे 5 लाखांनी वाढले. अरविंद केजरीवाल यांचे एक लाख फॉलोअर्स वाढले आणि ममता बॅनर्जी यांचे याच काळात 52 हजार फॉलोअर्स वाढले.