सायबर गुन्हेगारांकडून भाजप आमदारालाच गंडा, एटीएस अधिकारी असल्याचे भासवत दीड तासासाठी ‘डिजिटल अटक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या करत आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. लोकप्रतिनिधींही सायबर गुन्हेगारांपासून वाचले नाहीत. अलिकडेच, उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये, सायबर गुन्हेगारांनी भाजप आमदार शैलेंद्र प्रताप सिंह यांना ‘डिजिटल अटक’च्या बहाण्याने अडकवण्याचा प्रयत्न केला. आरोपीने एटीएस अधिकारी असल्याचे भासवून पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल केला आणि एमएलसींना सुमारे दीड तास होल्डवर ठेवले.

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्याने आमदाराना फोन केला आणि स्वतःची एटीएसचा अधिकारी म्हणून ओळख करून दिली. त्यानंतर त्याने व्हिडिओ कॉल सुरू केला. कॉल दरम्यान, आरोपी पोलिसांच्या गणवेशात दिसला, ज्यामुळे सुरुवातीला प्रकरण गंभीर वाटले. एका कथित प्रकरणाच्या तपासाचा हवाला देत कॉल करणाऱ्याने आमदारांना सहकार्य करण्यास सांगितले. या बहाण्याने त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर ठेवण्यात आले.

सुमारे दीड तासाच्या संभाषणादरम्यान आरोपीने आमदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. संभाषणादरम्यान आमदारांना शंका आली आणि त्यांनी सतर्क होत कोणताही आर्थिक व्यवहार होण्यापूर्वीच कॉल डिस्कनेक्ट केला. यानंतर, या संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आणि औपचारिक तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.