
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील सभेत व्हीव्हीआयपी कक्षात घुसखोरी करू पाहणाऱ्या एकाला बीकेसी पोलिसांनी अटक केली. रामेश्वर मिश्रा असे त्याचे नाव असून तो एनएसजीचा गार्ड असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मिश्राकडे दिल्ली पोलीस, पीएमओ सुरक्षा आणि एनएसजीचे ओळखपत्र आढळून आले आहे. त्या ओळखपत्राबाबत बीकेसी पोलिसांनी मिश्राला प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्याने मिश्राला अटक केली. मिश्रा हा एनएसजी किंवा लष्कराचा सैनिक आहे का, याचा तपास बीकेसी पोलीस करत आहेत. मिश्रा हा एनएसजीचे कार्ड घालून कशासाठी व्हीव्हीआयपी सेक्शनमध्ये जात होता याचा तपास बीकेसी पोलीस करत आहेत.



























































