नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल मिळाल्यानंतर केंद्रीय गृहखात्याने त्यांना ही सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी आता 11 कमांडो तैनात असणार आहेत. या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्यांचा समावेश आहे. हे सुरक्षा पथक 24 तास राणा यांच्याबरोबर राहणार आहेत.