
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले. बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱयांना फडणवीस यांचे संरक्षण होते. चार वर्षांपूर्वी बीकेसीमध्ये डीआरआयने छापा टाकला. त्यात 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना समीर वानखेडे यांनी मदत केली, असा स्फोटक आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज भाजपवर हायड्रोजन बॉम्बच टाकला.
नवाब मलिक यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोपांची मालिका लावली. समीर वानखेडे व ड्रग्ज प्रकरण, बनावट नोटांचे रॅकेट, गुंड मुन्ना यादव तसेच कुख्यात रियाज भाटीचे भाजपसोबतच्या कथित संबंधांवर भाष्य केले.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे व देवेंद्र फडणवीस यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. 2008 मध्ये समीर वानखेडे यांची मुंबईत नियुक्ती झाली. मागील 14 वर्षांपासून समीर वानखेडे हे मुंबईतच कसे, असा प्रश्न नवाब मलिक यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डचे कथित संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुन्ना यादव या कुख्यात गुंडाला महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष केले. हैदर आझम नावाच्या एकाला मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनचा अध्यक्ष केले. हा हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत आणण्याचे काम करीत होता. हैदरची दुसरी पत्नीही बांगलादेशी आहे. तिची मालाड पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू होती तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोपही केला.
नोटबंदी व बनावट नोटांच्या मुद्दय़ावरूनही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशभरात नोटबंदी जाहीर झाली त्यानंतर देशात बनावट नोटा पकडण्यात आल्या. तोपर्यंत महाराष्ट्रात खोटय़ा नोटांची एकही केस नोंदवली नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली राज्यात बनावट नोटांचा व्यवहार सुरू होता. पण 8 ऑक्टोबर 2017 रोजी बीकेसीमध्ये डीआरआयने कारवाई करून 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पण फक्त 8 लाख 80 हजार रुपयांची रक्कम जप्त केल्याचे दाखवून बनावट नोटांचे प्रकरण दाबण्यात आले. हे प्रकरण मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असूनही ही केस राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आली नाही, असे नवाब मलिक म्हणाले.
या बनावट नोटा कशा आल्या याची चौकशीही झाली नाही; कारण हे रॅकेट चालवणाऱयांना तत्कालीन फडणवीस सरकारचे संरक्षण होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले. कुख्यात रियाज भाटी याला मुंबई विमानतळावर खोटय़ा पासपोर्टसह पकडण्यात आले. या रिजाय भाटीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांसोबत फोटो आहेत. गुन्हेगारी जगताशी संबंध असलेला हाच रिजाय भाटी हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाहीर कार्यक्रमात दिसत होता, असे नवाब मलिक म्हणाले.
ते आरोपी चुकीचे
मंत्री नवाब मलिक यांनी केलेले ते आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. मलिक हे जबाबदार पदाकर असून ते पुराक्याकिना आरोप कसे काय करू शकतात. जेक्हा नोटा पकडल्या होत्या तेक्हा पंचनामा झाला होता. तसेच नोटा प्रकरणी चार जणांना अटकदेखील करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्या चौघांकर खटला भरला होता. काही महिने ते जेलमध्येदेखील होते. या नोटांबाबत आपण राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) ला माहिती कळकली होती.
समीर वानखेडे, झोनल डायरेक्टर, एनसीबी
फडणवीसांचा तोल गेला; डुकरासोबत कुस्ती केली तर…
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रख्यात लेखक-नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे एक वाक्य ट्विट केले आहे. ‘मी फार वर्षांपूर्कीच शिकलो आहे की डुकराशी कधीही कुस्ती खेळू नये. तुमच्या अंगाला घाण लागते. मात्र डुकराला घाण आवडते’ असे ट्विट केले आहे. राष्ट्रकादी काँग्रेस पक्षाचे प्रकक्ते नवाब मलिक यांनी आरोप केले असले तरी आपण त्या आरोपांना उत्तर देणार नाही अशी भूमिका घेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त ट्विट केले. फडणवीस म्हणाले, माझे ट्विट व आशीष शेलार यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. त्यापेक्षा जास्त महत्त्व या आरोपांना देण्याची गरज नाही.
आशीष शेलार यांची टीका; मानसिक संतुलन नीट ठेवा
नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशी टीका भाजप आमदार ऍड. आशीष शेलार यांनी केली. राजकारणात नीचतेची ही नवाब पातळी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. हायड्रोजन बॉम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल, अशा शब्दांत पलटवार केला. नवाब मलिक यांनी जे आरोप केले त्यात काही तथ्य नाही, असे सांगून आशीष शेलार म्हणाले की, त्यांनी कितीही खोदकाम केले तरी आरोप करायलासुद्धा तुम्हाला काहीही सापडू शकलेले नाही. मुन्ना यादव यांच्यावर राजकीय आंदोलनाचे आरोप आहेत, असे स्पष्टीकरण आशीष शेलार यांनी दिले.





























































