
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी विशेष न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. फेब्रुवारी महिन्यात अटक झाल्यापासून त्यांची ही पहिलीच नियमित जामीन याचिका आहे. न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला त्यावर 15 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने त्यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.






























































