
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खानला बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दहा तास चौकशी केल्यावर रात्री उशिरा अटक केली. खान याला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नुकतेच एनसीबीने ब्रिटिश नागरिक असलेला करण सजनानी त्याची प्रेयसी राहिला फर्निचरवाला, शाहिस्ता फर्निचरवालाला अटक केली होती. करणच्या घरातून एनसीबीने गांजा जप्त केला होता.
एनसीबी कोठडीदरम्यान करणच्या चौकशीत समीर खान याचे नाव समोर आले होते. मंगळवारी एनसीबीच्या पथकाने समीरला चौकशीसाठी समन्स दिल्यावर तो आज सकाळी साडेदहाच्या सुमारास चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आला. एनसीबीने समीर याची दहा तास चौकशी केल्यावर रात्री एनसीबीने समीरला अटक केली.































































