
जगभरात आणि देशभरात ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकार, मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत आहेत. ते थांबवण्यासाठी ट्विटरवर कारवाई करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला.
कोणत्याही देशात त्यांच्या कायद्यांतर्गत कुठलीही यंत्रणा असेल किंवा आस्थापना असेल त्यांच्यावर नियंत्रण करणे किंवा कारवाई करणे हा अधिकार असतो, परंतु केंद्र सरकार ट्विटरसोबत का भांडतंय हा प्रश्न आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
लोकांना स्पष्टपणे मत मांडायला ट्विटरसारखा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या बोलण्याच्या अधिकारावर गदा आणणे हे योग्य राहणार नाही, असेही मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

























































