कश्मीरात नॅशनल कॉन्फरन्स पंचायत निवडणुका लढवणार, निवडणूक आयोगाला लिहिले पत्र

453

जम्मू-कश्मीरात 5 मार्चपासून सुरू होणार्‍या पंचायत निवडणुका लढवण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे केंद्रीय सचिव रतन लाल गुप्ता यांनी यासंदर्भात रविवारी जम्मू-कश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांना पत्र लिहिले. पंचायत निवडणूका लढवण्याचा पक्षाचा निर्णय त्यांनी निवडणूक आयोगाला कळवला.

जम्मू-कश्मीरातील कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंचायत निवडणूका होणार आहेत. 5 मार्चपासून एकूण 11 टप्प्यांत या निवडणूका होणार असून त्यात 11 हजार जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय नॅशनल कॉन्फरन्सने घेतला आहे. राज्यात अजूनही लागू असलेले निर्बंध हटवण्यात यावेत तसेच नजरकैदेत ठेवलेल्या पक्षाच्या नेत्यांची सुटका करावी, अशी मागणीही नॅशनल कॉन्फरन्सने केली आहे. पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि अली मोहम्मद सगर हे नेते अजूनही नजरकैदेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या