
अकबर हा क्रूर पण सहिष्णू होता. बाबर अत्यंत निर्दयी होता. त्याने अनेक शहरांमध्ये अत्यंत क्रूरपणे लोकांची हत्या केली. तर औरंगजेबाने अनेक मंदिरे, गुरुद्वारा पाडले. गैर-मुस्लिमांवर कर लादले, असे बदल एनसीईआरटी अर्थात नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगच्या आठवीच्या पुस्तकात करण्यात आले.
मुघल काळात धार्मिक वातावरण कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न पुस्तकातून करण्यात आला आहे. इतिहासातील काळे अध्याय असा उल्लेख करत मुघलांचा इतिहासात पुस्तकात मांडण्यात आला आहे. समाजशास्त्र या विषयाच्या पुस्तकात हा बदल करण्यात आला असून हे पुस्तक याच आठवडय़ाच्या सुरुवातीला प्रकाशित करण्यात आले आहे. मुघल काळात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मातील मंदिरांमध्ये असलेल्या मूर्ती पह्डण्यात आल्या आणि लूट करण्यात आली. बिगर मुस्लिमांवर जिझिया कर लावण्यात आला. तसेच त्यांचा मुघलांकडून अवमान केला जात होता. तुम्ही धर्म बदला आणि इस्लाम स्वीकारा असेही त्यांना सांगितले होते, असे पुस्तकात सांगण्यात आले आहे.