
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार संदीप नाईक यांच्यापाठोपाठ नवी मुंबईतील हेवीवेट नेते माजी मंत्री गणेश नाईक यांचा पक्ष प्रवेश घडवून आणत राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का देण्याची तयारी भाजपने चालविली आहे. 9 सप्टेंबरला ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकामागून एक पक्षातून बाहेर पडत आहेत. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत 9 सप्टेंबरला वाशी येथे होणार्या जाहीर कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी राष्ट्रवादीचे ऐरोलीची आमदार आणि गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांनी 31 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नगरसेवकही वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत
गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर नवी मुंबई महानगर पालिकेतही मोठय़ा घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे 50 आणि 5 अपक्ष नगरसेकक पक्षातून बाहेर पडत वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. याआधीच संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रकेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या 22 आणि अपक्ष 4 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे नवी मुंबई महापालिकेकर भाजपचा झेंडा फडकणार आहे.


























































