
महाराष्ट्रातील आजची सकाळ राजकीय भूकंपाची ठरली असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांचा पाऊस सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली का? असा प्रश्न राज्यासह देशाच्या जनतेला पडला असताना खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल झालं आहे.

‘Party and family split’ असं वाक्य सुप्रिया सुळे यांनी स्टेटसवर ठेवलं आहे. यामुळे पक्षात फुट पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ‘अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे’, असं ट्वीट केलं होतं.
अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.
हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019



























































