उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर सस्पेन्स कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा मतदारसंघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. रविवारी सोलापुरातील महाजनादेश यात्रेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती, मात्र या कार्यक्रमातून ते गायब होते. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत ते भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. अशातच उदयनराजे यांनी ‘मी माझ्या अटींवर प्रवेश करेन’, असे म्हटल्याने हा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

Video फसवाफसवी करू नका! वर्षभरापूर्वी उदयनराजेंनी दिला होता शरद पवारांना इशारा

भाजप प्रवेशाबाबत प्रसारमाध्यांनी उदयनराजे भोसले यांची चर्चा केली. यावेळी उदयनराजे म्हणाले की, ‘जे काय होईल ते लोकांच्या हिताचे असेल. तसेच भाजपमध्ये जाण्यास आपल्याला उशिर झालेला नसून प्रत्येकाचे काही गणितं असतात’, असेही ते म्हणाले.

‘मेगाभरती’तून उदयनराजे भोसले गायब का? वाचा सविस्तर…

भाजपमधील मेगाभरतीबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, ‘आपल्याला मेगाभरतीची काही देणं घेणं नसल्याचे ते म्हणाले. कोणी इकडे जा, किंवा तिकडे जा. मी माझा निर्णय घेण्यास समर्थ आहे. मी माझ्या अटींवर प्रवेश करेन आणि मला कोणी सांगू शकत नाही काय करायचे ते’, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीकडून मनधरणीचा प्रयत्न
दरम्यान, भाजपच्यावर वाटेवर असणाऱ्या उदयनराजेंच्या मनधरणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहे. सोमवारी गणेश चतुर्थीचे औचित्य साधत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंद खोलीमध्ये चर्चा झाली.