ढोकळा न फाफडो, वेदांत प्रोजेक्ट आपडो! राष्ट्रवादी काँग्रेसचे ईडी सरकारविरोधात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ढोकळा न फाफडो, वेदांत प्रोजेक्ट आपडो…’, ‘पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके…’, ‘शिंदे-फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी…’, ‘गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते…’, ‘स्वतःला 50 खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके…’, ‘ईडी सरकार हाय हाय…’ अशा घोषणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याकर्त्यांच्या राष्ट्रवादी भवनचा परिसर आज दणाणून गेला.

महाराष्ट्रातील वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन पंपनीचा 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात नेणाऱया शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले.

युवक काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी राष्ट्रवादी भवन येथेच युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. त्यानंतर युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.