मी लोकांसाठी काय केलं, हे जेलवारी करणाऱ्यांनी विचारू नये; पवारांची शहांवर टीका

2336

मी लोकांसाठी काय केलं, हे जेलवारी करणाऱ्यांनी विचारू नये; अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना पवार यांनी शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर अस्तित्वाचे संकट; पवार कुटुंब एकाकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी शहा यांचा समाचार घेतला. सोलापूर दौऱ्यावर असताना शहा यांनी पवारांवर टीका केली होती. 15 वर्ष सत्तेत असताना पवारांनी काय केलं? असा सवाल शहा यांनी केला होता. या प्रश्नाला आता पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पवारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • सत्ता येते-जाते, त्याची काळजी नाही. मी 52 वर्षांपासून निवडून येतो. निवडून येण्याचा हा विक्रम आहे. जनतेमुळे इतके यश प्राप्त झालेय. त्यामुळे यश मिळणारच आणि इतिहास घडवणारच, असा विश्वास मला आहे.
  • संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात 1957 साली काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, सोलापुरात काँग्रेस जिंकली. त्यामुळे विधानसभेत इतर ठिकाणी काय झालं याची काळजी न करता, इथं सोलापूरमध्ये इतिहास घडवू.
  • पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. मावळणाऱ्यांची चिंता करू नका. उजाडणाऱ्यांची काळजी घेऊ, गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणाऱ्यांची चर्चा करा.
  • सोलापूर या स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना लोक जागा दाखवतात. स्वाभिमानाचा पुरस्कार करणाऱ्या जिल्ह्यात काही नेत्यांनी लाचारी पत्करली. त्यांना त्यांची जागा दाखवा.
  • सोलापूर कामगारांचा व शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा, चार हुतात्म्यांचा हा जिल्हा आहे. इतिहासात सुवर्णाक्षरात नाव लिहावं, असा हा जिल्हा आहे.
  • माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापुरातून झाली. 1965 साली मी तरुणांचं नेतृत्व केलं. तेव्हा सोलापूरची जबाबदारी माझ्यावर होती.

आपली प्रतिक्रिया द्या