करमाळ्यात राष्ट्रवादीने काढला आपल्याच उमेदवाराचा पाठिंबा

1486
ncp

करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला आहे, मात्र ऐनवेळी संजय पाटील यांचा पाठिंबा काढून घेत राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, संजय पाटील यांनी राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतल्याचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणारे संजय पाटील (घाटणेकर) यांना पक्षाने उमेदवारी दिली होती, मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाच्या कतीने देण्यात आले, परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा अर्ज मागे घेता आला नाही. राष्ट्रवादीने संजय पाटील यांचा पाठिंबा काढून घेतला असून कार्यकर्त्यांनी निवडणुकीत त्यांचे काम करू नये अशा सूचना सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका पत्रकाद्वारे सर्व पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

दरम्यान, सातत्यानं आम्ही शेतकरी चळकळीत सहभागी होत असतो. त्यामुळेच राष्ट्रकादी काँग्रेसने आम्हाला उमेदवारी दिली आहे. पण आता अजित पवार  यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीने भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचा आमच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या