प्लॅनेट मराठीवर एनसीपीएच्या  ‘प्रतिबिंब’ची झलक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅनेट मराठी आणि एनसीपीए यांनी नुकताच ‘प्रतिबिंब – मराठी नाटय़ उत्सव 2023’ आयोजित केला होता. वैविध्यपूर्ण नाटपं, वाचन, कॅम्पस टूर, नाटय़ तज्ञांशी संवाद, कार्यशाळा असे या उत्सवाचे स्वरूप होते. अनेक मान्यवरांची उपस्थिती या वेळी लाभली.

‘प्रतिबिंब’च्या माध्यमातून या वेळी रोहिणी हट्टंगडी, मकरंद देशपांडे, अमृता सुभाष, प्रतिमा कुलकर्णी, अनिता दाते, मुग्धा गोडबोले, सायली पाठक, आलोक राजवाडे, पर्ण पेठे, कादंबरी कदम यांच्यासह अनेक नामवंतांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाल्या आहेत. पहिल्या तीन मुलाखती प्रदर्शित झाल्या असून या कलावंतांनी आपला प्रवास, ‘एनसीपीए’शी जोडलेल्या  आठवणी, अनुभव, काही गमतीदार किस्से, नाटकाचा इतिहास अशा थिएटरसंबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. निवेदक श्रवण यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.