
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळून मधील नेते शेखर निकम यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
याआधी आपण तटस्थ असल्याची भूमिका शेखर निकम यांनी मांडली होती. आता मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली, आता ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या आहेत. त्या नाकारता येणार नाही. आता मला खोटं सांगितलं, अमूक झालं असं मी काही सांगणार नाही. माझ्याकडून जे झालं आहे ते झालं आहे. सह्या आणि अफिडेव्हिट देण्याचं कामही मी केलं आहे. आता जे काही परिणाम होतील, काहीही असतील शेवटी निर्णय घेताना, दोनातून एक निवडताना दोन्हीकडून परिणाम होणारच असतात. त्यामुळे अजित दादांसोबत राहणार हे मी ताईला आणि साहेबांच्या पीएला देखील सांगितल्याचं ते म्हणाले.


























































