
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए नावाला उरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ची विश्वसनीयता उरलेली नाही. पंतप्रधानांनी कधी बैठकही बोलावली नाही, अशा शब्दांत शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी पोलखोल केली आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजेपीय यांच्या काळात ‘एनडीए’मध्ये समन्वय आणि संवाद होता. सर्व मित्रपक्षांशी योग्य संबंध जपले जात होते. माझे वडील प्रकाशसिंग बादल एनडीएचे संस्थापक सदस्य आहेत. आज आम्ही एनडीएमध्ये नाही हे दुःखद आहे, असे सुखबीरसिंग बादल म्हणाले.


























































