नीना सिंग सीआयएसएफच्या पहिल्या महिला महासंचालक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेकडे सोपवण्यात आली आहे. देशभरातील विमानतळे, दिल्ली मेट्रो आणि देशभरातील इतर सरकारी इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी नीना सिंग यांच्यावर असणार आहे.