
नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून एक कोटी 10 लाख रुपयांना गंडविणाऱया अरविंद गोविंद चंडक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापुरातील मेहंदीअली इकरार सय्यद (मजरेवाडी) यांचा मुलगा 12 वी विज्ञान शाखेत शिकत होता. तो नीट परीक्षा देण्याची तयारी करत असताना अरविंद गोविंद चंडक (भवानी पेठ) यांच्याशी ओळख झाली. चंडक याने बेगळगाव येथील परीक्षा केंद्र माझ्या ताब्यात आहे. तेथून मुलाला अर्ज भरायला सांगा, 600हून अधिक गुण मिळवून देतो, असे म्हणून 2024 मध्ये एक कोटी 10 लाख रुपये घेतले. सन 2024 च्या नीट परीक्षेत मुलाने पेपर दिला; परंतु कमी मार्क मिळाले. 2025 मध्येही निकालात बदल झाला नाही. त्यामुळे सय्यद यांनी पैशांची मागणी केली. प्रारंभी चंडक याने 10 लाख परत केले. परंतु, उर्वरित एक कोटी रुपये देण्यास टाळाटाळ केली.

























































