काँग्रेसमध्ये धुसफुस, घराणेशाहीच्या मोहातून बाहेर पडा! गांधींवर आणखी एक लेटरबॉम्ब

केंद्रात सत्तेपासून दूर गेलेल्या काँग्रेस पक्षातील पक्षांतर्गत घमासान थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. विद्यमान वरिष्ठ नेत्याच्या नाराजीनाम्यानंतर आता गेल्या वर्षी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशच्या 9 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसचे अस्तित्व कायम राखण्यासाठी कठोर आणि निःपक्षपाती पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्ष हा केवळ देशाच्या राजकारणातील ‘इतिहासाचा भाग’ बनून राहू नये म्हणून परिवाराचा मोह आवरा आणि खंबीर निर्णय घेऊन पक्षाचे अस्तित्व राखा, असे साकडे पक्षाध्यक्षांना घातले आहे.

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्य़ा उत्तर प्रदेशच्या माजी वरिष्ठ काँग्रेस  नेत्यांमध्ये युपीचे माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार  विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष कधी नव्हता इतका दुबळा झाला आहे हे कुठेतरी थांबायला हवे असे सोनियाजींना लिहिलेल्या पत्रात या नेत्यांनी म्हटले आहे.

पगारी नेत्यांचा पक्षावर कब्जा

यूपीत काँग्रेसच्या प्रमुख पदांवर पगारी नेत्यांनी कब्जा मिळवलेला आहे. जे पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत आणि ज्यांना पक्षाची विचारधाराही अवगत नाहीय अशा नेत्यांच्या हातात युपीच्या काँग्रेसची धुरा जावी याहून ते मोठे दुर्दैव कोणते असा सूरही या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या