आधी पार्टी केली नंतर तर्राट मित्रानेच फोडले मित्राचे डोके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्षुल्लक वादातून मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नेरळमध्ये घडली आहे. आधी पार्टी केली नंतर तर्राट मित्रानेच मित्राचे डोके फोडले. स्वप्नील राणे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नेरळ पूर्व येथील साई मंदिर येथे कपिल भोईर आणि स्वप्नील राणे हे बसून मद्यपान करत होते. त्यानंतर दोघांनी एकत्र जेवणही केले. दरम्यान काही कारणावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या कपिलने हातातील कड्याने स्वप्नीलच्या डोक्यावर आणि नाकावर प्राणघातक हल्ला केला.