Nestlé चा मोठा निर्णय; 16 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

जगप्रसिद्ध कंपनी नेस्टलेच्या नवीन सीईओंनी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यातच फिलिप नवरातिल यांनी नेस्ले ग्लोबलचे नवे सीईओ म्हणून पदभार स्विकारला. कारोबार हाती घेतल्यानंतर कंपनीच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी  त्यांनी 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली तर कंपनी पुढच्या दोन वर्षात आणखी चार हजार पदं कमी करणार असल्याचे सांगितले. म्हणजेच 16 हजार लोकांना नारळ देणार आहे.

हा महत्त्वाचा निर्णय कंपनीचे नवीन सीईओ फिलिप नवरातिल यांनी घेतला, ज्यांना सप्टेंबर 2025 च्या सुरुवातीला या पदावर नियुक्त करण्यात आले होते.  काळ बदलत आहे आणि नेस्लेनेही वेगाने बदलले पाहिजे. त्यासाठी हा फेरबदल असल्याचे कंपनीने सांगितले. 16 हजार पंदांपैकी अंदाजे 12 हजार पदे व्हाईट कॉलर कर्मचाऱ्यांसाठी असतील. ही कपात कंपनीला जवळपास 1 अब्ज स्विस फ्रॅंक बचत करण्यास मदत करतील. आधीच नेस्टलेच्या प्रोडक्शन आणि सप्लाय चेन सेक्टरमध्ये  4 हजार पदांची कपात सुरु आहे. ज्या आता या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

कंपनीने हेही सांगितले की, 2027पर्यंत 3 अरब स्विस फ्रॅकची बचत करण्याचे उद्दीष्ट आहे. जे मागील 2.5 अब्जच्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. ही घोषणा त्यावेळी केली ज्यावेळी नेस्टलेने आपल्या 9 महिन्याची आर्थिक अहवाल जारी केला. अहवालात सांगण्यात आले आहे की. विक्रीत 1.9 टक्के घट झाली असून त्याला 65.9 अरब स्विस फ्रॅंकचा महसूल आहे.नेस्लेचे जगभरात 2000 हून अधिक ब्रँड आहेत. कंपनी आता खर्च कमी करण्यावर आणि जास्त नफा करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.