‘हे’ पदार्थ चहात बुडवून कधीच खाऊ नका !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवसाची सुरुवात प्रसन्न करणाऱ्या चहासोबत काही पदार्थांचा समावेश आपण आपल्या दररोजच्या आहारात केलेला असतो.  हे पदार्थ चहासोबतच खायला रुचकर लागतात, ते चहात बुडवून खाल्ले की चहा प्यायल्यासारखा वाटतो. बऱ्याच जणांना तर नुसता चहा पिणे नकोच वाटते. त्यासोबत काही ना काहीतरी खावेसे वाटते, पण अशावेळी चहाबरोबर ‘हे’ पदार्थ  खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते.

चहासोबत चटपटीत (नमकिन) अशी खारी, बिस्किटे, वेफर्स खायला बऱ्याच जणांना आवडते. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना किंवा आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेल्यास चहासोबत खारी-बिस्किट, वेफर्स, चिवडा हे पदार्थ हमखास ठेवले जातात, पण असे पदार्थ चहासोबत खाणे घातक ठरू शकते. यामुळे त्वचा आणि पोटाचे आजार होऊ शकतात, हे तुम्हाला माहित आहे का ?

आयुर्वेदानुसार, दुधाच्या चहासोबत तिखट-मीठाचे पदार्थ खाणे याला विरुद्ध अन्न मानले जाते. कारण गोड आणि खारट अशा चवीचे पदार्थ एकाच वेळी आपण खातो. या सवयीमुळे लठ्ठपणा, पोटाचे विविध आजार आणि त्वचेच्या तक्रारी वाढू शकतात. चेहऱ्यावर पांढरे डाग पडणे, कमी वयात वयवाढीची लक्षण शरीरावर दिसू लागणं अशा समस्या उद्भवू शकतात.  चहात दूध असते त्यामुळे मीठ घालून तयार केलेले पदार्थ चहाबरोबर खाणे अयोग्य आहे. दुधात मीठ घातल्याने दूध फाटते. त्यामुळे विरुद्ध प्रकृतीचे पदार्थ एकत्र खाऊ खाल्ल्याने काही आजारांना तोंड द्यावे लागू शकते.

कोणते पदार्थ चहासोबत खाऊ नयेत?

मुळ्याचे पराठे

हिवाळ्याच्या दिवसात मुळ्याचे पराठे हमखास केले जातात. या पराठ्यांना लोणीही लावलेले असे गरमागरम मुळ्याचे पराठे चहासोबत खाल्ल्याने पोट आणि त्वचेच्या तक्रारी उद्भवू शकतात. कारण चहात दूध असते. दुधासोबत मुळ्याचे सेवन करणे आयर्वेदात वर्ज्य सांगण्यात आले आहे. दूध आणि मुळ्याचे एकत्र सेवन केल्याने त्वचेवर पांढरे डाग येतात.

चहासोबत खारी-बिस्किटं
दूध घातलेल्या चहासोबत खारी-बिस्किटं कधीही खाऊ नयेत. यामुळे त्वचाविकार वाढू शकतात. त्याऐवजी गोड बिस्किटे खाऊ शकता तसेच आंबट पदार्थ खाल्ल्यानेही त्वचेचे आजार होऊ शकतात.

बेसनचे पदार्थ
काहींना चहाबरोबर भजी खायला आवडते. बेसन पिठापासून तयार केलेला कोणताही पदार्थ चहासोबत खाऊ नये. बेसन पिठाचा पदार्थ चहासोबत खाल्ल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.

कच्चे सलाड आणि उकडलेलं अंड
कच्चे सलाड, मोड आलेली कडधान्ये आणि उकडलेलं अंड हे पदार्थ चहासोबत खाऊ नयेत. यामुळे पोटाचे आजार होतात.

कोल्ड्रिंक
चहा प्यायल्यावर लगेचच त्यावर कोल्ड्रिंक पिऊ नये. यामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो. अॅसिडिटी, अपचन असे त्रास होतात. चहा पिण्याआधी पाणी प्यावं.