दिल्लीतील झोपडपट्टीत मोठी आग, सात जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची राजधानी दिल्ली येथील एका झोपडपट्टीला मोठी आग लागल्याचं वृत्त आहे. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

दिल्लीतील गोकुलपुरी परिसरात ही झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीच्या एका भागात शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. आग लागल्याचं वृत्त कळताच बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीतून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. आपण स्वतः जाऊन मृतांच्या नातेवाईकांना भेटणार असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तर इशान्य दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनीही शोक व्यक्त केला असून या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे केली आहे.