वहिनींना 11 लाखांची पैठणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला वर्गात लोकप्रिय असलेल्या झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे विशेष पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाचे नाव ‘महामिनिस्टर’ असे आहे. यामध्ये लाडके भावोजी आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिह्यांत पैठणीचा खेळ खेळणार आहेत. विजेत्या वहिनींना ‘महामिनिस्टर’चा खिताब आणि 11 लाखांची सोन्याची जरी असलेली पैठणी मिळेल. 11 लाखाच्या या महापैठणीसाठी चुरस रंगताना दिसेल. ‘महामिनिस्टर’ चे पर्व 11 एप्रिलपासून सोमवार ते रविवार सायंकाळी 6 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.