
देशाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) सनदी लेखापाल (सीए) परीक्षेच्या मूल्यमापन पद्धतीत बदल होणार आहे. त्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)ने नवीन शिक्षण आणि प्रशिक्षणाची योजना तयार केली आहे. त्यामुळे अंतिम परीक्षेपूर्वी आर्टिकलशीपचा कालावधी तीन वर्षांवरून दोन वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे. 1 जुलैपासून ही नवी प्रणाली लागू होणार आहे.
सीएच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत अनिवार्य मल्टी डिसिप्लिनरी केस स्टडी पेपर जोडण्यात आला आहे. नवीन योजनेअंतर्गत मध्यवर्ती आणि अंतिम स्तरावर प्रत्येक विषयातील 30 गुणांसाठी केस आधारित बहुपर्यायी प्रश्नांद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे. याशिवाय केस स्टडी पेपरमधील अनिवार्य भागांतर्गत विद्यार्थ्याच्या उच्चस्तरीय कौशल्यांचे आणि व्यावसायिक क्षमतेचे मूल्यांकन केले जाणार आहे.
– सध्याच्या योजनेनुसार फाऊंडेशन अभ्यासक्रमाचे प्रवेश 1 जुलै असून इंटरमिजीटएट आणि फायनल कोर्सची अंतिम मुदत 30 जून आहे.
– नवीन योजनेअंतर्गत फाऊंडेशन कोर्ससाठी नोंदणी 2 ऑगस्टपर्यंत करता येणार असून इंटरमिजिएट आणि फायनल अभ्यासक्रमांची नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://www.icai.org



























































