न्यू इंडिया बँक घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी एकाला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पवनकुमार अमरसिंह जैस्वाल असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने अटक आरोपींची संख्या 9 झाली आहे. न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळय़ाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांनी तपास करून आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. तर बँकेचे माजी उपाध्यक्ष हितेन आणि गौरी भानू हे ‘पाहिजे’ आरोपी आहेत. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस उत्तर प्रदेश येथे पोहोचले. तेथून पोलिसांनी पवनपुमारला अटक करून आज मुंबईत आणले. पवनकुमार हा बांधकाम साहित्य पुरवठादार आहे.