मस्जिद बंदर आणि परळ येथील प्रवासी सुविधांचे लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेने मस्जिद बंदर स्थानकातील पादचारी पूल आणि परळ स्थानकातील सरकता जिना व लिफ्टचे लोकार्पण मंगळवारी केले. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, आशीष चेंबूरकर आणि मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आले.

एल्फिन्स्टन रोड येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधांवर रेल्वेने भर दिला आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर स्थानकातील एक पादचारी पूल अवघ्या 33 दिवसांत बांधून नवा विक्रम स्थापन केला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मस्जिद स्थानकातील पादचारी पूल आणि परळ स्थानकातील लिफ्ट आणि सरकते जिन्यांची प्रवाशांना भेट मिळाली आहे.