मुंबईतील चार उपायुक्तांना नवीन जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस आयुक्तालयातील चार उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार प्रकटीकरण-1 चे उपायुक्त नीलोत्पल आता प्रकटीकरणचे काम पाहतील तर संग्रामसिंह निशाणदार यांच्याकडे प्रकटीकरण-1 ची, प्रकाश जाधव यांच्याकडे आर्थिक गुन्हे तर शाम घुगे यांच्याकडे जलद प्रतिसाद पथक विभागाच्या उपायुक्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.