
ऑक्टोबर महिना संपल्यावर 1 नोव्हेंबरपासून काही नवे नियम लागू होणार आहेत. त्यांचा परिणाम थेट नागरिकांच्या खिशावर होणार आहे. यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीपासून म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, टेलिकॉम सर्व्हिस यांचा समावेश आहे.
गॅस सिलेंडरचे दर – 1 नोव्हेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत, तर कमर्शिअल गॅसच्या किमती वाढू शकतील. याशिवाय सीएनजी, पीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतो. त्याचा परिणाम ग्राहकांवर होईल.
म्युच्युअल फंडाचे नियम – सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांना नॉमिनी किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून 15 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहाराची माहिती आपल्या कॉम्प्लायन्स ऑफिसरला द्यावी लागेल. हे पाऊल गुंतवणूकदारांची सुरक्षा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी उचलण्यात आले आहे.
एसबीआय कार्ड नियम – एसबीआय क्रेडिट कार्डवर नवे नियम लागू होतील. अनसिक्युअर्ड क्रेडिट कार्डवर आता 3.75 टक्के शुल्क लागेल. याशिवाय क्रेड, चेक आणि मोबिक्विक यासारख्या थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून केलेल्या एज्युकेशन अॅपवर 1 टक्के शुल्क घेण्यात येईल. मात्र शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा ऑनसाईट पीएसओ मशीनवरून केलेल्या पेमेंटवर शुल्क लागणार नाही. तसेच एक हजार रुपयांपेक्षा अधिकच्या वॉलेट लोड व्यवहारावर एक टक्के शुल्क घेतले जाईल. एसबीआय कार्ड चेक पेमेंट शुल्क म्हणून 200 रुपये घेते.
टेलिकॉम बदल – 1 नोव्हेंबरपासून टेलिकॉम कंपन्या स्पॅम कॉल आणि मेसेजबद्दल कडक नियम लागू करणार आहेत. सर्व स्पॅम नंबर्सना ब्लॉक केले जाईल, जेणेकरून युजर्सपर्यंत नको असलेले मेसेज किंवा कॉल पोहोचणार नाहीत.
बँक हॉलिडे आणि नियमात बदल
1 नोव्हेंबरपासून बँक हॉलिडेची नवीन यादी जाहीर होईल. नोव्हेंबर 2025 मध्ये बँका एकूण 13 दिवस बंद राहतील. ग्राहक आता त्यांच्या ठेवींसाठी एकावेळी किंवा अनुक्रमे जास्तीत जास्त चार नॉमिनी करू शकतात. यामुळे अनपेक्षित प्रसंग घडल्यास दाव्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.



























































