सरिताने आत्महत्या केली? ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये नवा ट्विस्ट

75

सामना ऑनलाईन । मुंबई

रात्रीस खेळ चाले मध्ये अण्णांनी आपल्या प्रतिष्ठेखातर दत्ताचे लग्न लावून दिले होते. त्यांचा संसार फुलत न फुलतोच त्यात त्यांच्या संसाराला ग्रहण लागले आहे.

वच्छीला भेटल्यामुळे दत्ताने सरिताला घराबाहेर काढले होते. त्यानंतर ती रात्रभर बाहेर होती. रात्री फक्त ती विहिरीजवळ दत्ताला भेटली. दत्तानेही रागाने तिला आत्महत्या करण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी माईने पांडूला तिचा शोध घेण्यास सांगितले. परंतु पांडुला सरिता काही सापडली नाही. भागात शेवटी पांडूला विहरीत काहीतरी दिसल्याचे दाखवले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुढे काय होईल याच्या काहीशक्यता वर्तवण्यात येत आहे. एक अर्थात तिने आत्महत्या केली असेल असे प्रथमदर्शनी दिसते. तसे नसेल तर सरिता नेमकी गेली कुठे? हा प्रश्न समोर येतो. आणि जर विहरित मृतदेह आढळला असेल तर तो कुणाचा असेल? आणि जर त्यात मृतदेह नसेल तर पांडूला नेमकं दिसलं काय? या सर्वांची उत्तरे आजच्या भागात पहायला मिळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या