
‘आर या पार’ ही थ्रिलर वेबसिरीज 30 डिसेंबरपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहे. पत्रलेखाने गेल्या वर्षभरात ‘बॅक टू बॅक’ चार प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यातील ‘आर या पार’ वेबसीरीज वर्षाअखेरीस प्रदर्शित होतेय. याशिवाय अमेझॉन प्राईमचा ‘गुलकंद टेल्स’, लव रंजनचा अनटाइटल्ड ड्रामा आणि मानवी गाग्रूचा आगामी प्रोजेक्टमध्ये ती झळकणार आहे. हे तिन्ही प्रोजेक्ट पुढच्या वर्षी प्रदर्शित होतील. पत्रलेखा सांगते, ‘हे वर्ष माझ्यासाठी समाधानकारक ठरले. चार वैविध्यपूर्ण पात्रे साकारताना मला खूप आनंद झाला.’





























































